Board Exam :
Photo Credit- Twitter

Board Exam : बोर्डाची परीक्षा म्हणजे आयुष्यातील सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हटंली जाते. या परीक्षेवर पुढचं भवितव्य अवलंबून असतं. चांगल्या मार्कांनी पास झाल्यास मान, सन्मान, पुढचं चांगलं शिक्षण मिळतं. त्याउलट, नापास झाल्यास सगळ संपलं म्हणून समजा. त्यामुळे सर्वच विद्यार्थी जीव तोडून अभ्यास करतात. तर काही असेही विद्यार्थी आहेत, जे चक्क कॉपी करताना पकडले जातात. पण सध्या एका विद्यार्थीनीचा पेपर सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. कारण, या पेपरमध्ये तिने जे काही लिहलंय ते वाचून शिक्षकही हैराण झाले आहेत. बिहार बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत  (Bihar Board Exams) इतिहासात हे पहिल्यांदाच झालं असेल. विद्यार्थीनीने पेपरच्या माध्यमातून शिक्षकांना पास करण्याची विनंती केली आहे. तिने म्हटलं आहे की, "सर मला पास करा, नाहीतर वडील माझे लग्न लावतील." (हेही वाचा : Maharashtra HSC Board Exam 2024: मुंबई विभागामध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपीचं पहिलं प्रकरण आलं समोर!)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरपत्रिका या भोजपूरमध्ये मूल्यमापनासाठी आल्या आहेत. या प्रती शिक्षक तपासत आहेत. तपासल्या जात असलेल्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी विचित्र उत्तरे लिहिली आहेत. एका विद्यार्थ्याने लिहलंय की, "माझी आई मजूर म्हणून काम करते. आम्ही खूप गरीब आहोत. मला पास करा". तर एका विद्यार्थीनीने भावनिक चिठ्ठी लिहिली आहे - "माझे वडील शेतकरी आहेत. अभ्यासाचा खर्च ते उचलू शकत नाही. म्हणूनच ते आम्हाला शिकवू इच्छित नाहीत आणि त्यांनी म्हटलंय की, जर मी परीक्षेत पास झाली नाही तर ते अभ्यास करू देणार नाहीत आणि माझे लग्न लावून देतील. मी गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझे वडील शेतकरी आहेत, त्यांना 400 रुपयेही मिळत नाहीत आणि ते मला कसे शिकवणार? ही एक समस्या आहे आणि दुसरे काही नाही असं तिनं म्हटंलय." (हेही वाचा:Maharashtra Hsc Board Exam 2024: परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी अनेक उपाय योजना, जाणून घ्या, अधिक माहिती)

बिहार बोर्डाकडून (Board Exam) 10वी च्या उत्तरपत्रिका तपासल्या जात आहेत. उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनादरम्यान, शिक्षकांना कविता, शायरी, प्रार्थना आणि नोट्स इत्यादी सामान सापडत आहे. शिक्षकांना भवनिक दुष्ट्या आकर्षित करण्यासाठी विद्यार्थी गणिताच्या विषयातही भावनिक नोट्स लिहित आहेत.