Bihar Assembly Elections 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिहार विधानसभा निवडणुकीचा (Bihar Assembly Election 2020) अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहे. आजतक आणि सी व्होटरच्या (C Voters) एक्झिट पोल निकालानुसार एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार, आरजेडी नेते जेसस्वी यादव यांना 44 टक्के आणि नीतीश कुमार यांना 35 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर, चिराग पासवान यांना 7 टक्के आणि उपेंद्र कुशवाहा यांना 4 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. ही आकडेवारी नीतीश कुमार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक ठरली आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. या निवडणूकीत कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. हे देखील वाचा-Exit Poll Results of Bihar Assembly Elections 2020: बिहार निवडणूक निकालामध्ये Times Now-C-Voter च्या अंदाजानुसार महागठबंधन च्या पारड्यात 120 तर NDA कडे 116 जागा

आजकच एक्झिट पोलचा निकाल-

बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. त्या वेळी राजद-जदयू या पक्षांच्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या. आता विधानसभा निवडणूक 2020 मध्ये जनता काय कौल देते याबाबत उत्सुकता आहे