Stock Market | (Photo Credit - Twitter/ANI)

Share Market Holiday: शेअर मार्केट (Share Market) मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेअर बाजारासाठी आज गुरुवार या आठवड्यातील शेवटचा दिवस आहे. या आठवड्यात शेअर बाजार फक्त 3 दिवस चालला. 5 दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यात सोमवार, 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त सुट्टी होती. आता प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी शुक्रवारी शेअर बाजार बंद राहणार आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रानंतर सलग 3 दिवस शेअर बाजारात कोणतेही कामकाज होणार नाही. कारण, शनिवार आणि रविवार ही साप्ताहिक सुटी आहे.

यावर्षी शेअर बाजाराला या दिवशी सुट्ट्या?

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी शेअर बाजारात 14 सुट्ट्या आहेत. (हेही वाचा - Online Fraud Helpline Number: तुम्ही ऑनलाइन फसवणुकीचे बळी पडला आहात का? या नंबरवर कॉल करून तुम्हाला परत मिळतील पूर्ण पैसे)

26 जानेवारी 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहील.

8 मार्च 2024: महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

25 मार्च 2024: होळीनिमित्त शेअर बाजारात सुट्टी असेल.

29 मार्च 2024: गुड फ्रायडेला शेअर बाजार बंद राहतील.

11 एप्रिल 2024: ईद-उल-फित्रमुळे शेअर बाजार बंद राहील.

17 एप्रिल 2024: रामनवमीनिमित्त शेअर बाजाराला सुट्टी असेल.

1 मे 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहील.

17 जून 2024: बकरी ईदमुळे शेअर बाजार बंद राहील.

17 जुलै 2024: मोहरममुळे शेअर बाजार बंद राहील.

15 ऑगस्ट 2024: स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजारात कोणतेही कामकाज होणार नाही.

2 ऑक्टोबर 2024: महात्मा गांधी जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहील.

1 नोव्हेंबर 2024: दिवाळीनिमित्त शेअर बाजाराला सुट्टी असेल.

15 नोव्हेंबर 2024: गुरु नानक जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहील.

25 डिसेंबर 20254: ख्रिसमसमुळे शेअर बाजार बंद राहील.

दरम्यान, 22 जानेवारी ला शेअर बाजारात कोणताही व्यवहार झाला नाही. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त या दिवशी शेअर मार्केट बंद होते. या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) सोबत इक्विटी विभाग, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि SLB देखील पूर्णपणे बंद होता.