Naxalites Killed In Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; चकमकीत 7 नक्षलवादी ठार, शोध मोहीम सुरू
Anti-Naxal Operation in Chhattisgarh's प्रतिकात्मक प्रतिमा (PC - X/@Nikhil17529828)

Chhattisgarh Naxal Encounter: छत्तीसगड (Chhattisgarh) मध्ये सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत किमान 7 नक्षलवादी (Naxalite) ठार झाले. नारायणपूरचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना सकाळी 11 च्या सुमारास ही चकमक सुरू झाली. नारायणपूरचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी यापूर्वी माहिती दिली होती की, चकमक स्थळावरून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्यातील जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स आणि स्पेशल टास्क फोर्स राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्यांचा समावेश असलेली ही कारवाई माओवाद्यांच्या इंद्रावती एरिया कमिटीच्या कॅडरच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे सुरू करण्यात आली. प्रभात कुमार यांनी सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले होते. जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर आणि स्पेशल टास्क फोर्स, दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्यांतील राज्य पोलीस या मोहिमेत सहभागी झाले होते. (हेही वाचा - Scorching Heat in Rajasthan: बिकानेरमध्ये पारा 47 अंशांवर; BSF जवानाने चक्क गरम वाळूवर भाजला पापड, व्हिडिओ व्हायरल (Watch))

चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत सात नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलवादी जंगलात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे हा छापा टाकण्यात आला. या घटनेमुळे राज्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत या वर्षात आतापर्यंत 112 नक्षलवादी ठार झाले आहेत. (हेही वाचा - Cambodia Cyber Slaves: तस्करी रॅकेटद्वारे सायबर फसवणूक प्रकरणात अडकलेल्या 60 भारतीयांची सुटका)

30 एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन महिलांसह दहा नक्षलवादी ठार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 29 नक्षलवाद्यांना ठार केले होते. 10 मे रोजी विजापूर जिल्ह्यातील पिडिया गावाजवळ सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले.