Scorching Heat in Rajasthan: सध्या देशात प्रचंड उकाडा आहे. अनेक ठिकाणी तापमान 45 अंशांच्या पुढे गेले आहे. उष्णतेमुळे नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. अशात राजस्थानमधून एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. बिकानेर येथे बीएसएफच्या जवानाने चक्क तप्त वाळूवर पापड भाजला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून बिकानेरमध्ये किती मोठ्या प्रमाणात उष्णता आहे, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. प्रतिकूल परिस्थितीत आपले सैनिक आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात कसे गुंतलेले आहेत, हे या व्हिडिओवरून दिसून येते. एकीकडे उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी लोक एसी आणि कुलरचा आधार घेत आहेत, तर दुसरीकडे देशाच्या सीमेवर तैनात असलेले आपले जवान या कडाक्याच्या उन्हात रात्रंदिवस सतर्क आहेत. व्हायरल व्हिडिओ बिकानेरमधील खाजुवालाजवळील पाक सीमेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Heat Wave Alert in North India: देशात उष्णतेची तीव्र लाट, दिल्लीसह उत्तर भारताला पुढील 5 दिवसाचा रेड अलर्ट)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)