Bijapur Naxal Encounter: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) विजापूर (Bijapur) मधून अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. विजापूरमधील गंगलूर पोलीस ठाण्याच्या (Gangaloor Police Station) हद्दीतील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत (Encounter) आठ नक्षलवादी (Naxalites) ठार झाले आहेत. अद्याप या ठिकाणी शोध मोहिम सुरू आहे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईत सहभागी होते. नक्षलवाद्यांकडून अधूनमधून गोळीबार सुरू असल्याने सुरक्षा दलाने यास प्रतिउत्तर दिलं. (हेही वाचा - Dantewada Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी ठार)
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बस्तर विभागात माओवाद्यांच्या उपस्थितीबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), विशेष कार्य दल (एसटीएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्यांच्या एलिट युनिट कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन) चे कर्मचारी सहभागी होते. (हेही वाचा - Encounter In South Bastar: भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश! छत्तीसगडमधील दक्षिण बस्तरमध्ये चकमकीत 12 नक्षलवादी ठार)
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये 29 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण -
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी कुतुल एरिया कमिटीच्या 29 नक्षलवाद्यांनी नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 22 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. नारायणपूर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे जिल्ह्यात सुरू असलेले विकासकाम. या भागातील नक्षलवादी जलद रस्ते बांधकाम आणि गावांपर्यंत पोहोचणाऱ्या विविध सुविधांमुळे प्रभावित झाले आहेत.