VIDEO: बेंगळुरुमध्ये आज लोकशाही दिनाच्या कार्मक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीस कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या सुरक्षेत चूक झाल्याची आढळून आले. कार्यक्रम सुरु असताना एक अज्ञात व्यक्ती मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या स्टेजकडे धावत गेला त्यामुळे सुरक्षा भंग झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. (हेही वाचा- मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पदाला धोका? कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांचे स्पष्ट विधान)
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या स्टेजवर एक संशयित व्यक्ती पळून गेला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ संशयित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. मात्र, अद्याप सदर व्यक्तीची ओळख आणि त्याचा हेतू समोर आला नाही. तो कोणत्या उद्देशाने स्टेजवर पळत आला हे देखील स्पष्ट झाले नाही.
सुरक्षेत त्रुटी
📍बेंगलुरु
कर्नाटक के CM सिद्धारमैया की सुरक्षा में बड़ी चूक सामने आई है. दरअसल, एक कार्यक्रम के दौरान एक युवक भागते हुए उनके मंच पर पहुंच गया. जिसे कार्यक्रम में मौजूद सुरक्षाकर्मियों ने दबोचा लिया और मंच से नीचे उतारकर पुलिस के हवाले कर दिया.@siddaramaiah #Bengaluru… https://t.co/xKyZW4fVws pic.twitter.com/vDqbA1GEWf
— Dainik Live (@Dainik_Live) September 15, 2024
मुख्यमंत्री सिध्दरामय्या मंजावर बसले असातना ही घटना घडली. प्रेक्षकांच्या मधून एक व्यक्ती धावत स्टेजकडे गेली. मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचण्याआधीच सुरक्षा कर्मचारी सतर्क झाले आणि त्यांना सदर व्यक्तीला पकडले. मात्र, या व्यक्तीचा हेतू अद्याप समजू शकला नसून पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
यापूर्वी देखील सुरक्षेत त्रुटी आढळली
मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या सुरक्षेत या आधी देखील त्रुटी आढळून आल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बेंगळुरू दक्षिण येथे निवडणूक रॅलीदरम्यान अशीच एक घटना उघडकीस आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना पुष्पहार घालताना काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने कंबरेमध्ये पिस्तूल लपवले होते, जे नंतर सुरक्षेतील गंभीर त्रुटी मानले गेले.