Uttarakhand Accident (PC - IANS)

Uttarakhand Accident: उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग-बद्रीनाथ महामार्गावर (Badrinath Highway) रौतेलीजवळ 23 प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत (Alaknanda River) पडला. या भीषण अपघातात (Accident) 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. एसडीआरएफ, अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, डीडीआरएफ आणि स्थानिक लोकांसह इतर टीम घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत.

बद्रीनाथ महामार्गापासून 5 किलोमीटर अंतरावर रौतेलीजवळ शनिवारी 23 प्रवाशांनी भरलेली टेम्पो ट्रॅव्हलर बस अनियंत्रित होऊन अलकनंदा नदीत पडली, ज्यामध्ये 23 पैकी 15 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून, सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Jharkhand Train Accident: आग लागल्याची अफवा पसरवली, धावत्या ट्रेनमधून प्रवाशांच्या उड्या, पाच जण दगावले)

बचावकार्य सुरू -

रुद्रप्रयागचे एसपी डॉ वैशाखा स्वतः घटनास्थळी उपस्थित आहेत. स्थानिक लोकांसोबतच एसडीआरएफ, अग्निशमन, पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, डीडीआरएफसह इतर पथक घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. (हेही वाचा- भिवंडीत दोन दिवसांत झालेल्या वेगळ्या रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू)

पहा व्हिडिओ - 

रुद्रप्रयागचे एसपी डॉ वैशाखा यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली की 23 प्रवाशांनी भरलेला एक टेम्पो ट्रॅव्हलर अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि रौतेलीजवळ अलकनंदा नदीत पडला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत 15 प्रवाशांना रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरितांची सुटका करण्यात येत आहे. किती प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.