
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील बरेली शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक्स गर्लफेंडचं लग्न ठरल्यावर बॉयफ्रेडने गर्लफ्रेंडवर गोळ्या घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. सोबत तीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत तरुणीच्या कुटुंबीयाकडून अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणा अतंर्गत तरुणीने पोलिसांत तक्रार केली होती. धक्कादायक म्हणजे यात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप आहे.
अखेर पीडित तरुणीने न्यायालयात दाद मागितली. आता न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी आरोपीविरोध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोजीपुरा येथील आहे.नवीजान असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीच्या भावाने कोर्टात दिलेल्या तक्रारीनुसार, चार वर्षापूर्वी आरोपीला त्याच्या बहिणीशी जबरदस्तीने लग्न करायचे होते. त्यावेळी बहिणीचे लग्न दुसरी कडे ठरल होते, या गोष्टीचा राग मनात धरत एकेदिवशी आरोपीने तरुणीला शेतात घेरले आणि तिच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने पीडित तरुणीचे जबरदस्तीने आक्षेपार्ह फोटो काढले. तीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीच्या कडून अडीच लाख रुपयांची मागणी केली. यात त्याच्या भावाचा देखील हात असल्याचे समजले. पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
तरुणी आणि तिच्या भावाने अखेर न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने पोलिसांना आरोप नवजीत आणि त्याच्या भावाला अटक करण्याचे आदेश दिले आहे. आरोपी फरार असल्याची माहिती मिळताच, बरेली पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.