बँक मॅनेजरने केली चिल्लरगिरी, घातला लाख रुपयांच्या चिल्लरचा गंडा
SBI Bank (Photo Credits: PTI)

Kolkatta: बँकेच्या मॅनेजरने बँकेतून चक्क चिल्लर पळवल्याची विचित्र घटना घडली आहे. या मॅनेजरने 84 लाखांची चिल्लरचा गंडा बँकेला घातला आहे.

तारक जयस्वाल असे या मॅनेजरचे नाव आहे. तर स्टेट बँकमध्ये मॅनेरच्या पदावर गेली आठ वर्षे कार्यरत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्यावर कारवाई केली आहे. या मॅनेजरने गेल्या काही वर्षांपासून थोडी थोडी चोरी करुन लाखो रुपयांची चिल्लर लंपास केली आहे.

बँकेच्या मॅनेजरने कोट्यावधींचे घोटाळे केल्याचे आपण ऐकले असेल परंतु अशी चिल्लरगिरी करणारा हा मॅनेजर पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.