वर्ष 2019 समाप्त होण्याकरिता शुल्लक दिवस राहिले असून लवकरच वर्ष 2020 ला सुरुवात होणार आहे. नवीनच्या निमित्ताने अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. परंतु, सुट्यांची माहिती नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडून जातो. महत्वाचे म्हणजे, जानेवारी च्या महिन्यात 10 सुट्ट्या आल्या असून बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखी भर पडली आहे. अनेकदा असे घडते की, खातेदारांना बॅंक बंद असल्याची माहिती नसल्याने त्यांचीही ये-जा होती. यामुळे खालील माहिती बॅंकेतील कर्मचारी आणि खातेदार दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहे.
जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे:
Date | Day | Holiday | Type |
1 जानेवारी | बुधवार | नवीन वर्ष | उत्सव |
2 जानेवारी | गुरूवार | गुरु गोविंद सिंह जयंती | उत्सव |
11 जानेवारी | शनिवार | दुसरा शनिवार | सार्वजनिक |
15 जानेवारी | बुधवार | भोगी, मकरसंक्रांत | उत्सव |
16 जानेवारी | गुरूवार | कनुमा | उत्सव |
17 जानेवारी | शुक्रवार | उझावर तिरुनाल | उत्सव |
23 जानेवारी | गुरुवार | नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती | उत्सव |
25 जानेवारी | शनिवार | चौथा शनिवार | सार्वजनिक |
26 जानेवारी | रविवार | गणतंत्र दिवस | सार्वजनिक |
28 जानेवारी | मंगळवार | Gothar Bathou Sun | उत्सव |
30 जानेवारी | गुरुवार | वसंत पंचमी, सर छोटू राम जयंती | उत्सव |
31 जानेवारी | शुक्रवार | Me-dam-me-phi | उत्सव |
आपल्याकडे आता सुट्टीची संपूर्ण यादी असल्याने आपण ट्रिप्स, सुट्ट्या आणि बरेच काही योजना आखण्यासाठी याचा वापर करु शकता. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या अधिकृत संकेतस्थळावरही सुट्टीची यादी तपासली जाऊ शकते. दरम्यान, शेवटच्या क्षणाची अडचण येऊ नये म्हणून आगाऊ आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.