Haryana Shocker: हरियाणा येथील सोहना येथे दु:खद घटना घडली आहे. बीटेक (BTech) शिकणाऱ्या तरुणीने आत्महत्या करून स्व:ताचे आयुष्य संपवले आहे. तरुणीने राहत्या सोसायटीच्या चौथ्या मजल्याहून उडी मारली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पुढील तपास सुरु केला आहे. दीपूंशा असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. हेही वाचा- क्षुल्लक कारणावरून 14 वर्षांच्या मुलाने केली आपल्या 7 वर्षाच्या बहिणीची हत्या; Baghpat मधील धक्कादायक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, दीपूंशा केआर मंगलम विद्यापीठाच्या बीटेकच्या द्वीतीय वर्षाची विद्यार्थ्यी होती. पोलिसांना माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. तरुणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी तीच्या राहत्या खोलीची तपासणी केली. तेथे कोणतीही सुसाइट नोट सापडली नाही. दीपूंशा सोहना येथील निवासी रहिवासी होती. भाड्याच्या खोलीत राहत होती. पहाटे ५ च्या सुमारास ती टेरेसवर गेली आणि तेथून उडी मारली. जमिनीवर कोसळल्याने ती गंभीर जखमी झाले.
स्थानिकांनी काही वेळानंतर तीला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी तपासणी करत आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मृत तरुणीला दारूचे व्यसन होते अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. दीपांशूच्या कुटुंबाना या घटनेनंतर मोठा धक्का बसला आहे.