![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/05/E2Y8zlZUUAkomSx-380x214.png)
काही दिवसांपूर्वी गुजरात (Gujarat) किनाऱ्याजवळ एका बोटीतून सात पाकिस्तानी (Pakistani) तस्करांना अटक केल्याप्रकरणी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठा खुलासा केला आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींचा अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा हेतू होता, मात्र एटीएसच्या पथकाला पाहताच सर्वजण घाबरले आणि त्यांनी ड्रग्जने भरलेल्या दोन पिशव्या समुद्रात फेकल्या. 31 मे रोजी, गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दल (ICG) यांनी गुरुवारी कच्छमधील गुजरात किनारपट्टीवरील बोटीतून सात पाकिस्तानी नागरिकांना अवैधरित्या भारतीय पाण्यात प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली. अल नुमान नावाची ही बोट देवभूमी द्वारकेच्या ओखा किनार्यावर नेण्यात आली, जिथे अवैधरित्या भारतीय पाण्यात प्रवेश केल्याप्रकरणी आरोपींना विदेशी कायद्यान्वये अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी बोटीमध्ये कोणतेही अंमली पदार्थ आढळून आले नाहीत.
सर्व आरोपी तस्करीचा प्रयत्न करत होते - गुजरात एटीएस
गुजरात एटीएस अधिकार्यांनी शुक्रवारी दावा केला की, आरोपी कच्छमधील जाखाऊ किनार्यावरून बोटीतून अंमली पदार्थांची तस्करी करून भारतीय पाण्यात नेण्याचा प्रयत्न करत होते. (हे देखील वाचा: Gujarat: वडोदरा जिल्ह्यातील नंदेसरी येथील कंपनीमध्ये स्फोटानंतर भीषण आग; 15 जण जखमी (Watch Video)
अटक करण्यात आलेल्या सात जणांची ओळख
मोहम्मद अक्रम बलोच, जुबेर बलोच, इशाक बलोच, शहीद अली बलोच, अश्रफ बलोच, शोएब बलोच आणि शहजाद बलोच अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुच प्रांतातील ग्वादर बंदरातून हे सात पाकिस्तानी नागरिक अल-नौमन नावाच्या बोटीतून निघाले होते.