ATM Cash Van PC (Wikimedia Commons)

Gujarat News: एका नामांकित बॅकेचे कोट्यावधी रुपयांनी भरलेले ATM कॅश व्हॅन एका अज्ञाताने पळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना गुजरात येथील गांधीधाम शहरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. गांधीधाम शहरातील बॅंकिग सर्कलजवळ असलेल्या एका नामांकित सरकारी बॅकेचे सुमारे दोन कोटी रुपयांची कॅश व्हॅन चोरीला गेली. पोलिसांना कॅश व्हॅन सुखरुप परत मिळाली असून परंतु आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे. (हेही वाचा- चोर महिला कॅमेऱ्यात कैद, हातचलाकीने घालायची गंडा)

तासाभरात व्हॅन हाती

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथील गांधीधाम शहरात नामांकित सरकारी बॅंकेचे सुमारे दोन कोटी रुपयांची कॅश व्हॅन एका अज्ञाताने चोरली होती. या घटनेनंतर पोलिस प्रशासनात देखील मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, चोराला शोधण्यासाठी कारवाई सुरु केली. सुदैवाने काही तासांच्या आत ATM कॅश व्हॅन पोलिसांच्या हाती लागली. पोलिस बॅकेच्या परिरसातील लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.

चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग केला आणि पकडले जाण्याच्या भीतीने आरोपींनी कॅश व्हॅन रस्त्याच्या मधोमध सोडून पळ काढला. पोलिसांनी एटीएम कॅश व्हॅन ताब्यात घेतले. पोलिसांना सर्तक राहून काही तासांतच व्हॅन ताब्यात घेतली. सद्या पोलिस संपुर्ण गुन्हाच्या तपास करत आहे. अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.   लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येईल अशी माहिती माध्यंमाना दिली आहे.