आसाम मध्ये विषारी दारु प्यायल्याने मृतांचा आकडा 127 वर पोहचला (फोटो सौजन्य-ANI)

आसाम (Assam) येथील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारु प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी (21 जानेवारी) दारु प्यायल्याने काही स्थानिक लोकांना अस्वस्थ वाटून आजारी पडले. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच रुग्णांना तातडीने गोलाघाट येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एएनआयने (ANI) दिलेल्या वृत्तानुसार, गोलाघाट येथील लोकांनी विषारी दारुचे सेवन केल्याने आतापर्यंत 127 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी काही स्थानिकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर मृत व्यक्तींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दारु उत्पादन शुल्काच्या काही कर्मचाऱ्यांनी ही दारु शहराच्या बाहेरुन आणल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसेच प्रशासनाकडून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. आसाम येथील गोलाघाट आणि जोरहाटमध्ये चहाच्या बागांमधील काही लोकांनी ही विषारी दारु प्यायल्याचे सांगितले जात आहे.