Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Assam News: आसाममधील कछार जिल्ह्यात असलेल्या भाजप कार्यालयात 17 ऑगस्ट रोजी गुरुवारी निर्वस्त्र अवस्थेत  एका 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह (Deathbody) सापडला. सुधांगशु दास असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह गुरुवारी पक्ष युनिट कार्यालयातील व्हीआयपी खोलीत आढळून आला.  ज्या कार्यालयात ही घटना घडली ते कार्यालय सिलचर शहरातील इटखोला परिसरात आहे. हा मृतदेह ज्या संशयास्पद परिस्थितीत सापडला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांना या घटनेची माहिती देताच  पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पलंगावर आणि निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याचे समजताच पक्षाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. गुरुवारी पहाटे हा मृतदेह सापडला, मृतदेह सापडल्यानंतर कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. भाजप जिल्हा पक्षाचे अध्यक्ष बिमलेंदू रॉय यांनी पोलिसांना बोलावले आणि त्यांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि कोणत्याही परिस्थितीजन्य पुराव्याची छेडछाड होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रथम परिसर सील केला. पोलिसांनी तात्काळ कार्यालयात उपस्थित असलेल्यांशी बोलून घटनेची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

मृतदेह सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (एसएमसीएच) पाठवण्यात आला. येथेच मृतदेहाचे शवविच्छेदन व वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर मयताच्या मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.