Chandrababu Naidu Arrest Video:
Chandrababu Naidu Arrest Video: आंध्रप्रदेश येथील सीआयडीने तेलगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक वॉरंट बजावले होते. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील वृत्त संस्थेने पोस्ट केला आहे.
भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) नायडू यांच्यावर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळी कारवाई केली. नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या त्यांच्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना नंद्याल येथून पहाटे अटक करण्यात आली. त्याला अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी आणि नंद्याल रेंजचे सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता.अखेर सकाळी सहा वाजता पोलिसांनी नायडूंना अटक करण्यात आली.