Mother Brutally Beats Son PC TWITTER

Hariyana Mother Brutally Beating Son: हरियाणा येथील फरिदाबाद परिसरातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आई आपल्या 11 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करत आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर अनेकांनी मारहाण करणाऱ्या आईवर संताप व्यक्त केला आहे. मारहाणीचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्याप मुलाची चौकशी केली नाही. (हेही वाचा- डेटवर गेलेल्या जोडप्यांना रंगेहात पकडलं, कुटुंबासह गावकऱ्यांकडून बेदम मारहाण, ग्वाल्हेर येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला बेदम मारहाण करत असल्याने वडिलांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती CWC (बाल कल्याण समितीच्या) देण्यात आली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, आई मुलाच्या अंगावर बसून त्याला मारहाण करत आहे. त्याला शिवीगाळ करत आहे.  सुरजकुंड पोलिस ठाण्यात आईविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने बाल कल्याण समितीकडे तक्रार केली. त्याने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, वडिल ड्रग्जचे व्यसन करतात. असे वक्तव्य करण्यासाठी मुलाला कोण दबाव आणत आहे याची चौकशी सुरु आहे.

आई मुलाला का मारत आहे हे अद्याप समोर आले नाही. घरी कोणी नसताना आईने बराच वेळा मुलाला बेदम मारहाण केली. ही घटना घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. लवकरच पोलिस पीडित मुलाची चौकशी करण्यात येणार आहे. मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुलाला जीवे मारण्याची धमकी देत असते अशी तक्रार पीडिताच्या वडिलांनी पोलिसांना केली आहे.