Mahakumbh Mela 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सोमवारी महाकुंभ मेळा 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. आमित शाह सोमवारी सकाळी 11:25 वाजता प्रयागराजमध्ये पोहोचतील. त्यानंतर ते त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान महाकुंभ मेळा 2025 मध्ये (Maha Kumbh Mela 2025)करतील. पवित्र स्नानानंतर ते बडी हनुमान जी मंदिर आणि अभयवटला भेट देतील. त्यानंतर ते जुना आखाड्यामध्ये महाराज आणि इतर संतांना भेट देतील आणि त्यांच्यासोबत महाप्रसाद घेतली. अमित शाह गुरु शरणानंद जी यांच्या आश्रमाला भेट देतील. गोविंद गिरी महाराज, शृंगेरी, पुरी आणि द्वारकेच्या शंकराचार्यांची भेट घेऊन महाकुंभ मेळाचा समारोप घेतील. (Maha Kumbh Mela 2025: कुंभ मेळ्याचा सुंदर नजरा आणि प्लेन मध्ये होत असलेली Announcement, येथे पाहा व्हिडीओ)
संध्याकाळी प्रयागराजहून दिल्लीला रवाना होतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अमित शाह यांच्या महाकुंभातील हजेरीचे प्रसिद्धीपत्रक महाकुंभ मीडिया सेंटरने जाहीर केले आहे, 25 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभ परिसरात वाहनांचे पास अवैध असतील. सार्वजनिक सुरक्षितता आणि गर्दी व्यवस्थापनासाठी हा परिसर "नो व्हेईकल झोन" म्हणून घोषित करण्यात आला आहे. वाहन मालकांना त्यांची वाहने जवळच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क करण्याचा आणि मीडिया सेंटरपर्यंत पोहोचण्यासाठी जीपीएस निर्देशांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रयागराजमधील महाकुंभ 2025 मध्ये भाविकांची अभूतपूर्व गर्दी दिसून आली आहे. शुक्रवारपर्यंत 10.80 कोटींहून अधिक लोकांनी गंगा-यमुना-सरस्वती संगमात पवित्र स्नान केले. प्राचीन परंपरेनुसार, महाकुंभ हा सनातन धर्माशी संबंधित सर्व जाती, पंथ आणि श्रद्धा असलेल्या लोकांचा आध्यात्मिक संगम म्हणून ओळखला जातो. 13 जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत चालेल. पुढील प्रमुख स्नान तारखांमध्ये 29 जानेवारी (मौनी अमावस्या - दुसरे शाही स्नान), 3 फेब्रुवारी (बसंत पंचमी - तिसरे शाही स्नान), 12 फेब्रुवारी (माघी पौर्णिमा) आणि 26 फेब्रुवारी (महाशिवरात्री) यांचा समावेश आहे.