
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेची धग अद्याप शमलेली नसताना पंजाब (Panjab) येथून अतिशय संतापजनक माहिती समोर आली आहे. लुधियाना (Ludhiana) येथे वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या एका तरूणीवर तिच्याच मित्रानी चालत्या कारमध्ये बलात्कार (Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडिताने दिलेल्या तक्रारीनंतर दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण लुधियाना शहर हादरून गेले आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी पीडित तरूणीचे मित्र आहेत. पीडित तरूणी ही आपल्या एका मित्राच्या वाढदिवसाला गेली होती. त्यावेळी हे दोघेजणदेखील त्या पार्टीला आले होते. पीडित पार्टी साजरी करून घरी परत जात असताना आरोपींनी तिला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले. त्यानंतर एका आरोपीने वाहन चालविणे चालू ठेवले. तर, दुसऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला चालत्या कारमधून खाली फेकून दोघेही पळून गेले. त्यानंतर पीडित तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या घटनेत वापरलेले कार पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. हे देखील वाचा- हैदराबाद: कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने इमारतीहून उडी मारून केली आत्महत्या; 20 तास पडून राहिला मृतदेह
दरम्यान, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच वरील घटनेने यात आणखी भर घातली आहे. यामुळे आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे इतर राज्यातही दिशा कायदा संमत करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. ज्यामुळे बलात्कारप्रकरणातील आरोपींना तातडीने कारवाई केली जाईल.