हैदराबाद: कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने इमारतीहून उडी मारून केली आत्महत्या; 20 तास पडून राहिला मृतदेह
Representational Image (Photo Credits: File Image)

देशात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढताना दिसत आहे. अशातचं आता हैद्राबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 55 वर्षीय कोरोना संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याच्या दु: खी पत्नीने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली आहे. स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्याचेदेखील समोर आलं आहे. रात्री उशीरानंतर महिलेचा मृतदेह उचलण्यात आला. परंतु, पतीचा मृतदेह सुमारे 20 तासांनंतर उचलण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, हैद्राबादमधील सैनिकपुरी येथील आंबेडकर कॉलनीत राहणारा 55 वर्षीय वेंकटेशला गेल्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याला इतरही काही आजारांची लागण झाली होती. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. मृत वेंकटेश हा एका बांधकाम ठिकाणी सुपरवायझर होता. त्यांच्या मृत्यूच्या दु: खामध्ये पत्नी धनलक्ष्मी (वय 50) यांनी त्याच दिवशी अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. (हेही वाचा - Devendra Fadnavis Coronavirus Positive: देवेंद्र फडणवीस यांना कोरोना व्हायरस संसर्ग, COVID 19 चाचणी पॉझिटीव्ह)

या दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. या दाम्पत्याच्या जवळ राहणारे श्रीधर राव यांनी सांगितले की, 'महिलेने दुपारी चार वाजता आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिस दाखल झाले. परंतु, रात्री दहा वाजता एक रुग्णवाहिका त्या महिलेचा मृतदेह घेण्यासाठी आली. तेथे लोकांची गर्दी जमली होती.' (हेही वाचा - Russian Research Centre मध्ये COVID-19 आणि Flu शी सामना करणारं Combined Vaccine बनवण्याचे प्रयत्न सुरू; जाणून घ्या रशियामधील कोविड 19 लसीबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स)

व्यंकटेशचा मृतदेह नेण्यासाठी बरीच मेहनत घेतली. पालिका अधिकाऱ्यांची मदत मिळण्यास बराच विलंब झाला. मृताच्या फ्लॅटसमोर राहणारे श्रीधर बाबू यांनी सांगितलं की, प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून पोलिसांपर्यंत सर्वचं मृताच्या मृतदेहाला हात लावण्यास घाबरत होते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी 11:30 वाजता मृतदेह गांधी रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, यावेळी मृत व्यक्तीचा मृतदेह योग्यप्रकारे पांघरूण घातले नव्हते. तसेच मृतदेह घेऊन जाताना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले नाही, असा आरोप देखील स्थानिकांकडून लावण्यात येत आहे.