राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus चाचणी पॉझिटीव्ह (Devendra Fadnavis Tests Positive for COVID 19 आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली. फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन मी सध्या क्वारंटाईन झालो आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, माझी कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी क्वारंटाईन झालो आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. परंतू, सुरक्षिततेचा उपाय म्हणून माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची कोरोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी. तसेच, वेळ पडल्यास स्वत:हून क्वारंटाईन व्हावे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, लवकर बरे होऊन आपण पुन्हा आपल्या कामासाठ परतू असेही फडणीसयांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने बिहार विधानसभा निवडणूक 2020 ची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे निवडणूक प्रभारी म्हणून फडणीस हे गेले काही काळ बिहारच्या दौऱ्यावर होते. बिहार दौऱ्यावरुन परतलेल्या फडणवीस यांनी लागलीच महाराष्ट्रतील विविध ठिकाणी दौरे केले. या दौऱ्यांमध्ये त्यांनी राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली. त्यानंतर विविध ठिकाणी पत्रकार परिषदाही घेतल्या. (हेही वाचा, Devendra Fadnavis on Package for Maharashtra Farmers: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवत जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका)
Former Maharashtra chief minister and BJP leader Devendra Fadnavis tests positive for #COVID19. pic.twitter.com/8KR9woPFuf
— ANI (@ANI) October 24, 2020
बिहार आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी केलेल्या दौऱ्यांमध्ये फडणवीस यांच्या संपर्कात अनेक लोक आले होते. यामध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह भाजपतील अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे. त्यामुळे फडणीस यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच आपली कोरोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी लागणार आहे.