Devendra Fadnavis on Package for Maharashtra Farmers: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवत जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (Archived, edited, images)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांना त्याचा जबरदस्त फटका बसला. याच कारणास्तव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र या पॅकेजवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा सुद्धा साधला आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले पॅकेज हे फसवे आहे.(Package For Maharashtra Farmers: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज केले जाहीर, दिवाळीपर्यंत दिली जाणार मदत)

फडणवीस यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, जाहीर करण्यात आलेले पॅकेज हे फसवणे असण्यासह बळीराजाला दिलेली ही मदत अतिशय तोकडी आहे. तसेच ही मदत देताना त्यांनी फक्त बहाणे शोधले आहेत. शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही जोंडाला पाने पुसणारी आहे. तसेच याआधी 25 हजार आणि 50 हजार हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाटी 1 लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. मात्र आता मदत द्यायची म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा ते प्रयत्न करत आहेत.(Package For Maharashtra Farmers: अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलेल्या 10 हजार कोटींच्या मदत पॅकेजचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत)

नियमित अर्थसंकल्पीय आकड्यांनाच पॅकेज म्हणून भासवले आहे. त्यालाच त्यांनी मलपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहेत. फक्त देखावा निर्माण करुन शेतकऱ्यांना याची काहीच मदत होणार नाही आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात बहाणेबाजी करत त्यांची निराशाच केली आहे. किमान शेतकऱ्यांच्या बद्दल तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहत काल्पनिक आकड्यांची धुळफेक मुख्यमंत्री करतील असे वाटले नव्हते असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे. पुढे त्यांनी असे ही म्हटले की, हा शेतकऱ्यांसोबत झालेला मोठा विश्वासघातच आहे. निर्सगाने अन्याय केला पण आता सरकार सुद्धा सूड घेत आहे.