Representational Image (Photo Credit: File Image)

बिहारच्या (Bihar) भागलपूरमध्ये (Bhagalpur) माणुसकी आणि पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या परिसरातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जुगारात हारला. त्यानंतर जुगरांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) केला. परंतु, या अत्याचाराविरोधात आवाज उठवला म्हणून पीडित महिलेच्या नवऱ्याने तिच्यावरच अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षापूर्वी पीडित महिलेचे आरोपीशी लग्न झाले होते. पीडिताला मुल-बाळ नसल्यामुळे आरोपी सतत तिला टोमणे मारायचा. आरोपी हा मद्यपी आणि त्याला जुगार खेळण्याची सवय आहे. याचदरम्यान, तो काही दिवसांपूर्वी जुगार खेळताना आपल्या पत्नीला हारला. त्यानतंर पाच-सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केला. याबद्दल तिच्या पतीबरोबर सतत भांडण सुरू होते. दरम्यान, तिने अत्याचाराविरोधात आवाज उठवला म्हणून आरोपीने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. दरम्यान, तिच्यावर जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु होते. हे देखील वाचा- Sonipat: दोन महिन्यांपूर्वी प्रेमात लग्न केलेल्या तरुणाची आत्महत्या? तरूणीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप

एएनआयचे ट्विट-

दरम्यान, पीडित महिल्या आपल्या माहेरी निघून आल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्वप्रकार तिने आपल्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर समाजिक कार्यकर्ता दीपक सिंह यांच्या मदतीने पीडित महिलेने मोजैदपूर पोलिस ठाण्यात पती व इतरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात न्युज १८ लोकमत हिंदीने वृत्त दिले आहे.