Snake found in the food: मुंबईतील एका डॉक्टराला त्याने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आइस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्यानंतर पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे. बिहारच्या बांका येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मेसमधील जेवणात सापाचे तुकडे सापडले. त्यामुळे विद्यार्थांना विषबाधा झाली होती. ही घटना गुरुवारी सांयकाळी घडली. या घटनेनंतर कॉलेजमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धक्कादायक घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॉलेज प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- पुण्याच्या Fortune Dairy ला प्रोडक्शन बंद करण्याचे आदेश; आईस्क्रिम मध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेनंतर FSSAI कडून कारवाई)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा 11 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. विषबाधा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना जेवल्यानंतर मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्यासारखं होत होते. विद्यार्थ्यांनी सांगितले की, जेवणात मृत सापाचा आढळला होता त्यामुळे विषबाधा झाली. विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाकडे याची तक्रार केली. विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॉलेजकडून कोणतीही मदत मिळाली नाही.
याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली. अभियांत्रिकी महाविद्यालयातील घटनेची माहिती मिळताच, डीएल अंकूल कुमार, एसडीओ अविनाश कुमार आदेशानुसार, शुक्रवारी संध्याकाळी महाविद्यालयात पोहचले. अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्याकडून घेतली. घटनेनंतर मेसमधील अन्न चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीला विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. लवकरच सर्व विद्यार्थी ठिक होतील.