Uttar Pradesh: प्रेयसीसोबत मजा करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहात पकडले; मग पुढे काय घडले? नक्की वाचा
Couple | Representational Image | (Photo credits: Pexels.com)

प्रेयसीसोबत मजा करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदा (Banda) जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. संबंधित महिलेचा पती एका मंदिराबाहेर कार उभी करून आपल्या प्रेयसीला प्रेमाने मसाला डोसा भरवत होता. हे पाहताच महिला संतापली व आपल्या भावाच्या मदतीने तीने पती आणि त्याची प्रेयसी या दोघांनाही जवळच्या पोलिस स्थानकात नेले. पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला आणि समज देऊन पतीला सोडून देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा पती राज्य सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो मंगळवारी संध्याकाळी आपल्या प्रेयसीला एका मंदिरात घेऊन गेला होता. तिथे जवळच असलेल्या एका रेस्तराँमधून त्याने प्रेयसीसाठी मसाला डोसा घेऊन आला. मात्र, आपल्या प्रेयसीला प्रेमाने मसाला डोसा भरवत असतानाच त्याला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघांत बाचाबाची झाली. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. परंतु, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी महिलेची तक्रार न घेता तिच्या पतीला समज देऊन सोडून दिले आहे. हे देखील वाचा- Rajasthan: भरतपुर येथील महिलेला गेले 5 महिने कोरोना विषाणूचा संसर्ग; तब्बल 31 चाचण्या सकारात्मक आल्याने डॉक्टरही बुचकळ्यात

याआधी संबंध असलेल्या व्यक्तीला आयपीसी कलम 497 अंतर्गत शिक्षा केली जात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने 2018 साली कलम 497 रद्द केला आहे. यामुळे विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरत नाही.