एकट्यात दारु पिण्याचा अधिकार द्या, हायकोर्टाकडे याचिका केली दाखल
फोटो सौजन्य- Pixabay

गुजरातमध्ये शासनाने दारुबंदी केल्याने तो प्रत्येक व्यक्तीचा खासगीपणाचे आणि समानतेच्या अधिकाराविरुद्ध असल्याचे एका अहमदाबादमधील व्यक्तीचे म्हणणे आहे. त्यामुळेच एकट्यात दारु पिण्यास परवानगी हायकोर्टाने द्यावी यासाठी त्याने चक्क याचिकाच कोर्टात दाखल केली आहे.

राजीव पटेल असे या याचिकाकर्त्याचे नाव आहे. तर गुजरातमध्ये शासनाने लागू केलेल्या दारुबंदीच्या निर्णयाला त्याने विरोध केला आहे. तसेच तेथे कोणत्याही व्यक्तीसोबत खासगी ठिकाणी जाऊन दारु पिण्यास सक्त मनाई आहे. मात्र दारुबंदी म्हणजे व्यक्तीच्या मुलभुत हक्कावर बंदी आणण्यासारखे असल्याचे राजीव यांना वाटत आहे. तर एकट्यात दारु प्यायल्याने कोणाला त्रास किंवा कोणतेही नुकसान होत नसल्याच्या दावा राजीव पटेल यांनी केला आहे. तसेच त्यांनी या दाव्यासाठी जॉन स्टुअर्ट मिल यांचा हवालाचा आधार घेतला आहे.

राजीव यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये दारुबंदीवरील कलम12,12,14-1 बी, 65 आणि 66 काढून टाकण्याची मागणी केली आहे. तर पटेल यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने घेतली असून या घटनेतील शासनाची बाजू ही ऐकून घेण्यात येणार आहे.