उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील (Hathras Rape Case) दलीत मुलीवर गेल्या महिन्यात काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशात संताप्त व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ही घटना ताजी असतानाचं हाथरसमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बलात्कार प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन आहेत. तसेच पीडित मुलगी फक्त 4 वर्षांची आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपी मुलांना ताब्यात घेतले आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, शुक्रवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हाथरस येथे 4 वर्षांच्या मुलीवर 9 आणि 12 वर्षांच्या दोन मुलांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. (हेही वाचा - Hoshiarpur Rape Case: पंजाबमध्ये 6 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या; आरोपीच्या घरात आढळला पीडितेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह)
दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी गुरुवारी या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर स्थानिक हाथरस जंक्शन पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, हे दोन्ही आरोपी त्याच खेड्यातील आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. (वाचा - Madhya Pradesh: माता न तूं, वैरिणी! कुऱ्हाडीचे घाव घालून आईने केली 24 वर्षीय मुलाची हत्या; अंधश्रद्धेतून घडले कृत्य)
गेल्या महिन्यात हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर पीडितेही मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पीडितेने रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला होता. पीडितेवर त्याच गावातल्या चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ला दिले होते. सध्या सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.