Room heater (PC - pixabay)

Shocker: उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहराइच जिल्हा मुख्यालयातील कोतवाली नगर येथील चांदपुरा परिसरात हिटर (Room Heater) लावून झोपलेल्या एका कुटुंबातील 8 महिन्यांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच कुटुंबातील इतर चार सदस्य बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोतवाली नगरचे प्रभारी निरीक्षक (एसएचओ) मनोज पांडे यांनी सांगितले की, चांदपूर येथील 30 वर्षीय व्यापारी शफी अहमद, त्याची पत्नी सिमरन (25), आठ महिन्यांची मुलगी उम्मे कुलसूम, चार वर्षांची मुलगी झैनब आणि 6 वर्षांचा मुलगा हसन हे खोलीत हिटर लावून झोपले होते. (हेही वाचा - Bihar Crime: पैशावरुन वाद, मजूराचे डोळे फोडले; पाचशे रुपयांसाठी गळा चिरून हत्या)

संपूर्ण कुटुंब बेशुद्धावस्थेत आढळले -

मनोज पांडे यांनी सांगितले की, थंडीमुळे खोलीत हिटर चालू होता. सकाळी घरातील सदस्य बाहेर न आल्याने लोकांनी लक्ष दिले नाही, मात्र शुक्रवारी दुपारपर्यंत कोणीही घराबाहेर न आल्याने स्थानिक लोकांनी दरवाजा ठोठावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवाजा न उघडल्याने लोकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सर्वजण बेडवर बेशुद्धावस्थेत आढळले. शेजाऱ्यांनी सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 8 महिन्यांच्या उम्मे कुलसूमचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुटुंबातील इतर चार सदस्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी जिल्हा दंडाधिकारी मोनिका राणी यांनी थंडीची लाट आणि थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोळशाच्या शेगडी/हीटरचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. खोलीत हवेचे परिसंचरण टिकवून ठेवावे, जेणेकरून विषारी धूर खोलीत जमा होणार नाही. झोपताना कधीही बंद खोलीत हीटर/फायरप्लेस वापरू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.