बिहारमधील (Bihar) एका 20 वर्षीय तरुणाची अतिशय क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. किरकोळ पैशांच्या वादातून ही हत्या आरा ( Ara Labourer Murder) येथे झाल्याचे झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मोहन सिंह असे या तरुणाचे नाव आहे. केवळ 500 रुपयांवरुन झालेल्या वादातून त्याची हत्या करण्या आल्याचा आरोप होतो आहे. मारेकऱ्यांनी मोहन याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह शेतात फेकून दिला. जो सनवारी पुलाजवळील एका शेतात आढळून आला. सदर मृतदेहाचे फोटो आणि इतर काही माहितीचा तपशील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तातडीने घटनेची नोंद घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
धारधार शस्त्रांनी हल्ला करुन फोडले डोळे
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना इतकी भयावह आहे की, मारेकऱ्यांनी पीडिताची हत्या केलीच. मात्र, त्याचे डोळे काढले आणि गळाही चिरला. असेही सांगितले जात आहे की, आरोपींनी पीडित मोहन सिंह याला त्याच्या घरातून बाहेर काढले. त्याला बेदम मारहाण केली आणि त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्लाही केला.आरोपी इतके बेभान झाले होते की, ते पीडिताला शेतात घेऊन गेले. तिथे त्याचे डोळे कढले. पीडिताच्या मृतदेहावर धारधार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा दिसून येत आहेत. पोलिसंनी मृतदेह ताब्यात घेऊन आरा सदर रुग्णालात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनेक गोष्टींचा उलघडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपींनी पीडिताला घरातून उचलून नेले किंवा नाही याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (हेही वाचा, Young Temple Priest Killed: तरुण पुजाऱ्याची निर्घृण हत्या, डोळे आणि जीभ नसलेला मृतदेह आढळला; बिहार पोलिसांची चौकशी सुरु)
पीडिताच्या भावाकडून पोलिसात तक्रार
पीडिताचा भाऊ राधा सिंह यांनी बिहार पोलिसांना माहिती देताना सांगितले की, त्याच्या भावाने अजय महतो नावाच्या ओळखीच्या एका स्थानिक व्यक्तीकडे काम केले होते. त्या कामाची 500 रुपयांची मजूरी त्याला मिळाली नव्हती. त्यामुळे सदर व्यक्तीकडे तो ती मजूरी सातत्याने मगत असे. त्यामुळे महतो चिडला होता. त्याने त्याच्या काही माणसांना पाठवून उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले. तो घरातून बाहेर गेला. मात्र, बराच काळ उलटून गेला तरी परतलाच नाही. त्यामुळे आमचा संशय वाढला आणि आम्ही चौकशी सुरु केली. (हेही वाचा, Bihar Shocker: Instagram वर Reels बनवण्यापासून रोखल्याने पत्नीने केली पतीची हत्या; आरोपी महिलेला अटक)
पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. या प्रकरणात पोलिस आरोपींच्या मागावर आहेत. गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणाला अटक झाल्याचे वृत्त नाही. तसेच, शवविच्छेदन अहवालाचीही प्रतिक्षा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.