Rajastan Car Accident: राजस्थानमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. राज्यातील डुंगरपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्ग 48 वर चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची एका खासगी बसला धडक बसली.या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीसांना धाव घेत अपघाताची नोंद घेतली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून जाणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाला. बसच्या आणि कारच्या धडकेत हा अपघात घडून आला. या घटनेत कारला जोरदार धडक लागल्याने कारमधील चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तात्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी जखमी प्रवासांला रुग्णालयात नेले. तसेच अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
बिछवाडा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीत चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची खजुरी नाळ येथे गुजरातहून डुंगरपूरकडे जाणाऱ्या खासगी बसला धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की समोरून कारचे पूर्ण नुकसान झाले. सतीश भाई (25), अंकित निनामा (25), रवी (23) आणि कौशिक (21) अशी मृतांची नावे आहेत. अपघाती कार ही गुजरात येथील असल्याची माहिती मिळली आहे.