Delhi Rain Photo Credit TWITTER

 Delhi Rain: दिल्लीत ठिकठिकाणी पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाली तर वाहतुक सेवेवर ही परिणाम झाला आहे. एकीकडे पावसाचे पाणी साचल्यामुळे तयार झालेल्या डबक्यात बूडून एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील रोहिणी भागात घडली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा- पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे मोठा अपघात, ड्रायव्हरसह एकाच कुटुंबातील 8 जण नदीत वाहून गेले)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडे सहा वाजता अमन विहार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहणी येथील सेक्टर -20 येथे ही घटना घडली. पावसामुळे तयार झालेल्या डबक्यात बूडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उद्यानात पावसाचे पाणी साचले होते त्यामुळे उद्यानाजवळील तलाव देखील पाण्याने भरले होते. या पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. या प्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. याआधी 27 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे राऊच्या आयएएस सर्कलमधील तळघरातील लाब्ररीत पाणी शिरल्यामुळे ३ UPSC उमेदवारांचा मृत्यू झाला होता.