पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे रविवारी एका कारमधून लग्न समारंभाला जाणारे एकाच कुटुंबातील 8 जण आणि हिमाचल प्रदेशातील चालक वाहत्या नदीत वाहून गेले. ज्यामध्ये सर्वांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये काही लोकांचे मृतदेह सापडले आहेत. काही लोकांचे मृतदेह अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.हेही वाचा : Woman Swept In River: भद्राद्री कोठागुडेम येथे पूरग्रस्त भाग ओलांडताना महिला वाहून गेली, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (Watch Video)
अपघातानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (SUV) च्या चालकासह कुटुंबातील 11 सदस्य हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मेहतपूरजवळील देहरा येथून पंजाबमधील एसबीएस नगर जिल्ह्यातील मेहरोवाल गावात लग्नासाठी जात होते. समारंभ याच क्षणी हा अपघात झाला. पाण्याच्या जोरदार लाटांमुळे स्थानिक लोकांनी चालकाला नदी ओलांडण्या पासून सावध ही केले होता, असेही पोलिसांनी सांगितले. यानंतरही त्याने नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जोरदार प्रवाहात नागरिकांसह कारही वाहून गेला.
भारी बारिश के कारण पंजाब-हिमाचल सीमा पर एक इनोवा गाड़ी बाढ़ में बह गई, जिसमें 11 लोग सवार थे। इनमें से एक व्यक्ति को बचा लिया गया, जबकि 10 लोग लापता हैं। सभी लोग एक ही परिवार के थे . पुलिस और ग्रामीणों द्वारा उनकी तलाश जारी है।
#Hoshiarpur #Flood | #kamaljitsandhu pic.twitter.com/VN6RM8ucNw
— With Rahul Gandhi (@amitsri32137925) August 11, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक लोकांनी कसा तरी वाचवला. त्यानंतर त्यांना पंजाबमधील जैज येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. दीपक भाटिया असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
अपघातानंतर सुरजीत भाटिया, त्यांची पत्नी परमजीत कौर, भाऊ स्वरूप चंद, वहिनी बाईंडर, भाची भावना आणि अनु, भाचा हर्षित आणि ड्रायव्हर बिंदू अशी मृतांची नावे आहेत. अपघातात मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून हिमाचल प्रदेशातील इतर कुटुंबीयांना ही दु:खद बातमी कळवण्यात आली आहे.