Driving License to Armless Woman: केरळच्या हात नसलेल्या 32 वर्षीय महिलेला ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) साठी सहा वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर फळ मिळाले. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी स्वतः दिव्यांग जिलुमोल एम. थॉमस (Jilumol M.Thomas) यांना कागदपत्र सुपूर्द केले. जन्मतः हात नसलेल्या जिलुमोलने नेहमी पाय वापरून कार चालवण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु, तांत्रिक कारणास्तव तिच्या विनंतीला आव्हान देण्यात आले.
जिलुमोल एम. थॉमसने सांगितलं की, मोबिलिटी ही माझी सर्वात मोठी अडचण होती. आता मला परवाना मिळाल्यामुळे मी माझ्यातील सर्वात मोठा अडथळा पार करत आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील वदुथला येथील ड्रायव्हिंग स्कूलने नोंदणी करण्यास सहमती दर्शविल्यानंतर पहिला अडथळा दूर झाला. (हेही वाचा - Aadhaar-Driving License Linking: आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स कसे लिंक कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)
आम्हाला फारसा आत्मविश्वास नव्हता, पण तिने आपल्या जिद्द आणि वचनबद्धतेने आमची धारणा चुकीची सिद्ध केली. लवकरच आम्हाला समजले की ती ते करू शकेल, अशी प्रतिक्रिया ड्रायव्हिंग स्कूलचे मालक जोपन यांनी दिली. (हेही वाचा - Driving License: आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळवा चालक परवाना)
Finally, 32-yr-old #Kerala armless woman gets driving license
Read: https://t.co/XjwwalGlwb pic.twitter.com/IrwdGYv8sh
— IANS (@ians_india) December 4, 2023
दरम्यान, कोची येथील Vi Innovations Pvt Ltd ने 2018 च्या मारुती सेलेरिओमध्ये सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करून इच्छित इलेक्ट्रॉनिक बदल केले. यामुळे दिव्यांग महिलेचं कार चालवण्याचं स्वप्त शक्य झालं. तिला राज्य अपंग व्यक्ती आयोगाकडून मोठा पाठिंबा होता.