Arrest | Pixabay.com

Former IT Employee Arrested for Stealing Laptops: नोएडा येथील जस्सी अग्रवाल (Jassie Agarwal) या 26 वर्षीय तरुणीला बेंगळुरू पोलिसांनी (Bangalore Police) अटक (Arrest) केली आहे. तिच्यावर लोकांचे लॅपटॉप (Laptops) आणि गॅजेट्स चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी जस्सीला ताब्यात घेतले असता तिच्याकडून 10 ते 15 लाख रुपये किमतीचे 10 ते 15 लॅपटॉप जप्त करण्यात आले.

जस्सी अग्रवाल ही नोएडाची रहिवासी असून ती नोकरीसाठी बेंगळुरूला आली होती. पण कोरोनाच्या काळात तिची नोकरी गेली. यानंतर ती पीजीमधून लॅपटॉप आणि गॅजेट्स चोरून ते आपल्या गावी काळ्या बाजारात विकायची. (हेही वाचा - Mumbai Shocker: रुग्णालयातून बाळाची चोरी, खळबळजनक घटनेचा व्हिडिओ आला समोर, कांदिवलीतील घटना)

चोरी करण्यासाठी, जस्सी गुप्तपणे पीजी आणि हॉस्टेलच्या रिकाम्या खोल्यांमध्ये प्रवेश करायची आणि चार्जिंगसाठी ठेवलेले लॅपटॉप चोरायचा. पोलिसांनी जस्सीकडून 10 ते 15 लाख रुपयांचे एकूण 24 लॅपटॉप जप्त केले आहेत. (हेही वाचा - Dombivli Crime: भिंत फोडून लाखो रुपयांच्या दागिन्यांची केली चोरी, डोबिंवलतील घटना)

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जस्सी अनेक भागात चोरी करत होती आणि हे बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. गुन्हे शाखेने जस्सीचे पीजीमध्ये प्रवेश करताना आणि चोरीच्या गॅजेट्ससह बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहेत. जस्सी सध्या पोलिस कोठडीत आहे.