Telangana Suicide: मोबाईल दुरुस्ती करुन देण्यास नकार दिल्याने 19 वर्षीय मुलीची आत्महत्या, तेलंगणातील घटना
Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Telangana Suicide: तेलंगणा येथील एका १९ वर्षीय मुलीने क्षुल्लक कारणांमुळे आत्महत्या केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या पालकांनी तिच्या मोबाईल फोन दुरुस्त करण्यास नकार दिल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंचेरिलयल जिल्ह्यातील जयपूर मंडळाल्या वेलाला गावात घडली आहे.( हेही वाचा-  सोशल मीडीयात रील साठी अपहरणाचा प्रॅन्क व्हिडीओ शूट करणं 4 मुलांना पडलं महागात

मिळालेल्या माहितीनुसार, साईशुमा असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तरुणी 19 वर्षाची आहे.  तरुणी वेलाला गावातील रहिवासी आहे. साईशुमा पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. साईशुमाचे आई वडिल शेतात काम करतात. दररोज कामानिमित्त तीचे आई वडिल शेतात गेले त्यावेळी मुलीने राहत्या घरात गळफास घेतला. घरी आल्यानंतर पाहिले की, मुलीने गळफास घेतला. घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

आई वडिलांसोबत नेहमी भांडण फोन दुरुस्ती करण्याबाबत भांडण होत असायचा. साईशुमा फोन वापरण्यास बेजबदार असल्याचे सांगून तिला फोन दुरुस्ती करण्यास नकार देत होते. तीने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले आहे. आई वडिल मुलांसाठी कित्येक गोष्टी करत असतात. तरीही मुलं या मौल्यवान गोष्टीची किंमत ठेवत नाही. या धक्कादायक घटनेमुळे साईशुमाच्या कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे. साईशुमाच्या पश्ताच तिचे आई वडिल आणि एक भाऊ आहे.