रुपया (Photo Credits: PTI)

कोरोना महामारीमुळे देशाला आर्थिक संकटाला सामोर जावा लागले आहे. नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांना देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला होता. या अर्थसंकल्पात अनेक महत्वाचे घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने (Central Government) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रवास भत्ता अवकाश योजनेत कॅश व्हाऊचर (Cash Voucher Scheme) योजनेला नोटिफाय केले आहे. याचा अर्थ असा की, या रकमेवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

देशाचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सितारमण म्हणाल्या की, कोरोना महामारीमुळे कर सवलतीत एलटीसीचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे सरकार कर्मचाऱ्यांच उत्पन्न वाढले आणि पैसा जमा झाल्यावर तो खर्चही केला जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या संपूर्ण व्यवस्थेचा फायदा हा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल. कोरोनामुळे ज्या कर्मचाऱ्यांना एलटीसीचा फायदा घेता आलेला नव्हता त्यांना प्रवास भत्ता अवकाश योजनेत कॅश व्हाऊचर योजनेचा फायदा दिला जाईल. हे देखील वाचा- 7th Pay Commission: लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; पगारात सध्या वाढ होणार नाही

केंद्र सरकारने कॅश व्हाऊचर योजनेची सुरुवात 12 ऑक्टोबर 2020पासून केली होती. महत्वाचे म्हणजे, याआधी ही योजना केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी होती. मात्र, काही काळानंतर यात बदल करून या योजनेत खासगी आणि इतर राज्यातील कर्मचाऱ्यांनाही सामील करून घेतले गेले.