Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

केरळ: कोचीतील पल्लारीवट्टम उड्डाणपूल पुर्नबांधणीनंतर आजपासून जनतेसाठी खुला ; 7 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Ashwjeet Jagtap | Mar 07, 2021 11:31 PM IST
A+
A-
07 Mar, 23:31 (IST)

कोचीतील पल्लारीवट्टम उड्डाणपूल पुर्नबांधणीनंतर आजपासून जनतेसाठी खुला करण्यात आला आहे.

07 Mar, 22:16 (IST)

एनसीबी मुंबईचे अधिकारी गोव्यातील काही ठिकाणी छापे टाकत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत आणि काही ड्रग पुरवठा करणाऱ्या लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबी अधिकारीने ही माहिती दिली.

07 Mar, 21:33 (IST)

द्रमुक सत्तेत आल्यास दरवर्षी 10 लाख रोजगार निर्माण होतात. पुढील दहा वर्षांत आम्ही कमी गरीबीतून 1 कोटी लोकसंख्येला बाहेर काढू आणि तमिळनाडू गरीब नसलेले पहिले राज्य होईल. तसेच तामिळनाडूमध्ये द्रमुक सत्तेत आल्यास प्रत्येक शिधापत्रिकाधारक गृहिणीला दरमहा एक हजार रुपये मिळतील. द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी हे सांगितले आहे.

07 Mar, 20:32 (IST)

औरंगाबाद मध्ये 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दर शनिवार-रविवार कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

07 Mar, 20:10 (IST)

महाराष्ट्रात आतापर्यंत 52 लाख 18 हजार 840 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यातील 48,39,500 जणांना कोविशील्ड लस देण्यात आली आहे.

07 Mar, 19:31 (IST)

मुंबईत 1360 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,33,564 वर पोहोचली आहे.

07 Mar, 19:25 (IST)

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 11,141 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 22,19,727 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 52,478 वर पोहोचली आहे.

07 Mar, 19:07 (IST)

कराड तालुक्यात एक दुचाकी वांग नदीच्या पात्रात उलटली. यात 2 जणांचा मृत्यू झाला असून दोघे बचावले.

07 Mar, 18:13 (IST)

Mansukh Hiren मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र ATS पथकाने  गुन्हेगारी कट रचणे, खून करणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी FIR नोंदविला आहे.

07 Mar, 17:52 (IST)

आंध्र प्रदेश मध्ये 136 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 लाख 90 हजार 692 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 7174 वर पोहोचली आहे.

Load More

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 10 हजार 187 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 22 लाख 08 हजार 586 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 52 हजार 440 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र, आज म्हणजेच रविवार, दिनांक 7 मार्च 2021 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण होणार नाही. यासंदर्भात महापालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे मागे घेतले जावेत या मागणीसाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास काल 100 दिवस पूर्ण झाले आहेत. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी केएमपी एक्सप्रेस-वे जाम करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, शेतकरी नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टीकैत यांनी शेतकऱ्यांचे आभार मानत म्हटले आहे की, हे कायदे रद्द होईपर्यंत किंवा योग्य ते बदल होईपर्यंत हा संघर्ष कायम राहिल. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि जिंकू.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरीच्या जवळ गेल्याने महविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका सुरू केली. शिवसेना आणि काँग्रेसने वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. पेट्रोलचे वाढते भाव लक्षात घेता राज्यांनीही काही कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी भूमिका केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडली होती.


Show Full Article Share Now