Karnataka News: शालमला नदीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू; 3 मृतदेह सापडले, शोधमोहिम सुरु
Drown | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Karnataka News: कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरा कन्नड जिल्ह्यातील सिरसीजवळील शालमला नदीत रविवारी एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली. कुटुंबातील पाच सदस्यांपैकी तीन सदस्यांचे मृतदेह (Deathbody) सापडले आहे. अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सापडलेल्या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. कुटुंबातील एक मुलगा नदीत घसरल्याने हा दुर्घटना घडली. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्या बचावासाठी गेले पण तेही पाण्यात बुडाले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब नदी काठी फिरायला आले होते. एक मुलगा पाण्यात उतरला आणि थोड्याच वेळाने तो खोल पाण्यात बुडू लागला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एक एक सदस्याने पाण्यात उडी मारली परंतु त्यानंतर पाण्याच्या वेग वाढल्याने सर्वजण पाण्यात बुडले.  मोहम्मद सलीम (44), नादिया (20), मिसबाह (21), नबिल (22) आणि उमर (16) अशी कुटुंबातील सदस्यांची ओळख पटली आहे. मच्छेमारांनी या मृतदेहांना बाहेर काढले आहे. आणखी दोघांचे मृतदेह नदीत आहे त्यांचा शोध सुरु आहे. (हेही वाचा- हिमाचलमध्ये पावसाने कहर, 21 जणांचा मृत्यू, बियास नदी पुन्हा खवळली; )

24 तासांच्या कालावधीत कर्नाटकात बुडण्याची ही दुसरी घटना आहे.  मासेमारी मोहिमेदरम्यान त्यांची मासेमारी बोट उलटल्याने दोन मच्छिमार अरबी समुद्रात बुडाले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.