Jammu Kashmir Update: लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवादी साथीदारांना अटक, जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
Security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) दक्षिण काश्मीरच्या पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात स्लीपर सेल मॉड्यूलचा (Sleeper cell module) पर्दाफाश केला आहे. प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) पाच सक्रिय दहशतवादी साथीदारांना अटक (Arrested) केली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की पुलवामा जिल्ह्यातील अनेक ग्रेनेड हल्ल्यांशी (Grenade attacks) संबंधित प्रकरणांच्या तपासा दरम्यान पोलिसांनी पाच सक्रिय दहशतवादी साथीदारांना अटक करून प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करच्या सक्रिय साथीदारांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला. हेही वाचा जानेवारी महिन्यापासून कपडे, चप्पल खरेदी करणे होणार महाग; GST च्या दरात होणार दुप्पट वाढ

शौकत इस्लाम दार, एजाज अहमद लोन, एजाज गुलजार लोन, मंजूर अहमद भट आणि नसीर अहमद शाह अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व लेल्हार पुलवामा येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हे मॉड्यूल स्लीपर सेल म्हणून काम करत होते आणि ते शस्त्रास्त्रे, दारूगोळा खरेदी तसेच वाहतुकीत गुंतले होते.

त्यांनी त्यांच्या मालकांच्या सांगण्यावरून सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ले केले. त्यांच्या ताब्यातून शस्त्र, दारुगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.  पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.