बिहार: पाटना येथील एका घरात बॉम्ब स्फोट; 5 जण गंभीर जखमी

बिहार (Bihar) जिल्ह्याची राजधानी पाटना (Patna) येथील एका घरात बॉम्ब स्फोट (Bomb Explosion) झाल्याने 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज सोमवारी सकाळी घडली आहे. जखमींना जवळील पीएमसीएच रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भयंकर होता की, यात संपूर्ण घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच स्थानिक लोकांनी सांगितले की, एका पाठोपाठ 2 जोरदार स्फोट झाले असून दूरपर्यंत या स्फोटचा आवाजा ऐकायला आला होता. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

एका घरात चक्क बॉम्ब स्फोट झाल्याची धक्कादायक माहितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या घरात बॉम्ब स्फोट झाला, या घरातील लोक भाड्याने राहत होते. यावर घर मालकाने सांगितले की, ज्या घरात स्फोट झाला तिथे एक रिक्षाचालक गेल्या सहा महिन्यांपासून राहत होता. तसेच भाड्याने राहणाऱ्या व्यक्तींची त्याच्याकडे अधिक माहिती नसल्याचे घर मालकाने सांगितले आहे. हे देखील वाचा- निसर्गाचा चमत्कार! 6 महिन्यांच्या बाळाच्या पोटातून काढला 250 ग्रॅम वजनाचा गर्भ; ऑपरेशननंतर मुलाची प्रकृती स्थिर

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, संबंधित ठिकाणी स्फोट झाल्याने आजूबाजुच्या परिसरात एकाच खळबळ उडाली असून नागरिक एकडे-तिकडे धाव घेऊ लागले होते. या स्फोटमुळे बाजूच्या तिन्ही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेत जखमींमध्ये एका महिलाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. बॉम्ब स्फोटात घराचा भिंत आणि दरवाजाचे नुकसान झाले होते. तसेच आजूबाजूच्या घराच्या खिडक्या देखील तुटल्या आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार पाटना येथील एसपी डी अमरकेश यांनी या बॉम्ब स्फोटला गॅस सिलिंडरचा स्फोट सांगितले होते.