Assam Rifles महिला सैनिक पहिल्यांदाच कश्मीरमध्ये तैनात; 4 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Ashwjeet Jagtap
|
Aug 04, 2020 11:59 PM IST
आज, मुंबई आणि शहरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि शहरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. कांदिवली येथे डोंगराचा भाग कोसळल्याने मीरा रोडहून मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली असून रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. मुसळधार पावसाचा मुंबई लोकल ट्रेनवरही मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे धीम्यागतीने धावत आहे. तसेच कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबली आहे.
सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
राज्य विधिमंडळातील विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहातील आमदारांच्या निधी खर्चाबाबत लवकरच नवी नियमावली सादर होणार आहे. या आधी असल्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीचे अध्यक्ष आहेत. तर, एकनाथ शिंदे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई हे या समितीचे सदस्य आहेत. राज्याच्या नियोजन विभागाने याबाबतचा सरकारी निर्णय आज (सोमवार, 3 ऑगस्ट) काढला आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी केलेला दावा मुंबई पोलिसांनी फेटाळला आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार 25 फेब्रुवारी या दिवशी दिली नव्हती, असे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात आतापर्यंत 18 लाख 3 हजार 695 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 38 हजार 135 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 लाख 86 हजार 203 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या संपूर्ण देशात 5 लाख 79 हजार 357 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत.