Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रस्ता अपघातात मित्र गमावल्यानंतर एका 28 वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी यासंदर्भात बुधवारी माहिती दिली. इंदूर-अहमदाबाद महामार्गावरील (Indore-Ahmedabad Highway) नालखेडा (Nalkheda) येथे मंगळवारी सायंकाळी कांती नावाच्या व्यक्तीने झाडाला गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचे पोलिसांनी सांगितले. हे धक्कादायक पाऊल उचलण्याआधी त्याने एक व्हिडिओ देखील बनवला होता. ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, त्याच्या मित्राचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यामुळे आपण हे पाऊल उचलणार आहोत.
राजगड पोलिस स्टेशनचे प्रभारी संजय रावत यांनी सांगितले की, महामार्गावर दोन मोटारसायकलींच्या धडकेत नर्वे सिंग (वय, 29) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र कांती बचावला. दोघेही झाबुआ जिल्ह्यातील फुलदान वाडी येथे राहत होते. उज्जैनहून घरी परतत असताना हा अपघात झाला. (हेही वाचा -Maharashtra Suicide Cases: देशात 2022 मध्ये महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक आत्महत्या; रोजंदारीवर काम करणारे सर्वात असुरक्षित: NCRB Data)
मित्राच्या मृत्यूने निराश झालेल्या कांतीने अपघातस्थळाजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या अपघातात दुसऱ्या मोटारसायकलवर स्वार असलेले दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा -Bank Employee Committed Suicide: वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या)
आत्महत्या करण्यापूर्वी कांतीने एक व्हिडिओ स्टेटमेंट रेकॉर्ड केले होते. ज्यामध्ये त्याने सांगितले की, अपघातात त्याच्या मित्राचा मृत्यू झाल्याने तो उद्ध्वस्त झाल्याने आपण हे पाऊल उचलत आहोत, असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचेही यावेळी अधिकाऱ्याने नमूद केले.