Youth Suicide: तरुण मंडळीत मोबाईल वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याच्या चित्र दिसत आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत सतत मुलांच्या हातात मोबाईल दिसतो. दोन दिवसांपूर्वी नागपुर शहरात वडिलांनी मुलीला मोबाईल कमी वापरण्यास सांगितले यावरून मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरम्यान इंदौर शहारात अशीच घटना घडली आहे. तरुणाने आईकडे मोबाईल मागितला आणि तिने फोन देण्यास नकार दिल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदौर येथील एरोड्रोम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागिन नगर परिसरात ही घटना घडली आहे. विनय असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबासोबत नागिन नगर परिसरात राहत होता. विनयचे वडिल राजू पाल, हे कंटक्टर म्हणून काम करतात. घटनेच्या वेळीस आई वडिल दोघेही घराच्या बाहेर कामानिमित्त गेले होते. विनय घरात एकटा होता. विनय याचे पेपर असल्याने आईने त्याला फोन देण्यास नकार दिला. तो निराश झाले. आणि नैराश्यात त्याने टोकाचे पाऊल उचलले. (हेही वाचा- वडिलांनी मोबाईलचा जास्त वापर करण्यास दिला नकार; 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या)
या घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठी खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास पोलिस करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर विनयच्या पालकांवर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.