छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक (PC - ANI)

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सुकमा येथे सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये (Naxals) चकमक झाली. या चकमकीत 3 जवान शहीद झाले असून 14 जवान जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या चकमकीत 5 ते 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे.

दरम्यान, या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच जखमी सैनिकांना रायपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना या चकमकीसंदर्भात माहिती दिली आहे. (हेही वाचा - चैन्नई मध्ये Muslim League कडून हॅन्ड सॅनिटायर आणि मास्कचं वृद्धाश्रमांमध्ये वाटप; 22 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

तसेच छत्तीसगडचे डीजीपी अवस्थी यांनी चकमकीसंदर्भात माहीती देताना सांगितले की, या चकमकीत पाच ते सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच 3 जवान शहीद झाले असून 14 जवान जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. याशिवाय अद्याप 13 जवान बेपत्ता आहेत. सध्या जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.