Rajasthan Tragedy: कोटा येथे महाशिवरात्री मिरवणुकीत 14 मुलांना विजेचा धक्का, ऊर्जामंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; पहा व्हिडिओ
14 children electrocuted (PC - X/ANI)

Rajasthan Tragedy: राजस्थानमधील कोटा (Kota) शहरात महाशिवरात्री (Maha Shivratri) च्या मुहूर्तावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत किमान 14 मुलांचा विजेचा धक्का (Children Electrocuted) लागला. स्थानिक वृत्तानुसार एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रुग्णालयात जाऊन मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही घटना दुपारी साडे बाराच्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ घडली. घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमी मुलांना तातडीने एमबीबीएस रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. रुग्णालयाचे व्हिज्युअल इंटरनेटवर समोर आले आहेत. ज्यात पालक आपल्या मुलांना त्वरित वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत असल्याचं दिसत आहे.

महाशिवरात्री मिरवणुकीदरम्यान अपघात -

सकतपूर काझी बस्ती येथे मिरवणुकीदरम्यान ज्या ठिकाणी हा मोठा अपघात झाला. त्या ठिकाणी हाय टेन्शन वीज तारा अतिशय कमी उंचीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुलांना विजेचा झटका बसला. या अपघातामागे विद्युत विभागाचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसत आहे.

या अपघातानंतर मोठा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळाकडे धावले. त्यांनी जखमींना रुग्णालयात नेले. कोटामधील सकतपूरच्या काली बस्तीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त यात्रा काढण्यात आली होती. यावेळी मुलांनी एका लांब पाईपवर ध्वज लावला होता. हा ध्वज घेऊन मुले चालत असताना अचानक पाईपचा हाय टेंशन लाईनला स्पर्श झाला आणि पाईपमध्ये विद्युत प्रवाह पसरला.

पहा व्हिडिओ - 

या घटनेतील दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्याचे ऊर्जामंत्रीही रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी मुलांची विचारपूस केली. ऊर्जामंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.