Karnataka Accident: कर्नाटकात एक भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी तालुक्यात ही घटना घडली. शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. मिनी बसची (Mini Bus) ट्रकला धडक लागल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर शहरात शोक व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा- जे जे उड्डाणपूलावर शाळेच्या बसला अपाघात ; दोन मुलं, क्लिनर जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसमधील प्रवाशी बेलगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यात्रेनंतर ते घरी परतत होते. घरी परतत असताना ही घटना घडली. मिनी बस अनियंत्रित झाली आणि थेट थांबलेल्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, मिनी बस आणि ट्रक दोघांचे नुकसान झाले. 13 यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते त्यामुळे पुढे जाऊन हा अपघात झाला.
Horrific accident in Karnataka’s Haveri district, 13 killed#Karnataka #Haveri #HaveriAccident #HaveriAccident pic.twitter.com/kmflILfW6I
— Asianet Newsable (@AsianetNewsEN) June 28, 2024
अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ झाला. वाहतुक सेवा विस्कळीत झाली. दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. मिनी बस चालकाला बस चालवताना डुलकी लागली होती यात बस अनिंयत्रित झाली आणि ट्रकला धडकली. या अपघातानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून मृतदेह ताब्यात घेतले आहे.