toy train PC TW

Chandigarh: पंजाब (Punjab) राज्यातील चंदीगड येथे ह्रदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील प्रसिध्द मॉलमध्ये टॉय ट्रेन उलटल्याने 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी 22 जून रोजी घडली आहे. या घटनेनंतर परिरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा- सराफा व्यावसायिकाला गोळ्या घालून लुटणाऱ्या तीन गुन्हेगारांना चकमकीनंतर अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एलांते मॉलमध्ये खेळण्यासाठी आणि मज्जा करण्यासाठी आलेल्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाा आहे. टॉय ट्रेनमध्ये खेळत असताना अचानक ती उलटी झाली त्यामुळे एका 11 वर्षाच्या मुलावर मृत्यू झाला. शाहबाज असं मुलाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ऑपरेटरवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी टॉय ट्रेन ताब्यात घेतली आहे. शाहबाज हा धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी अचानक ट्रेनचा भार एका बाजूला गेला आणि ट्रेन पलटली. शाहबाज खाली पडल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाहबाजच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जतिंगर पाल सिंग यांनी या घटनेची पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. टॉय ट्रेन ऑपरेटर सौरभ आणि मॉलच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला आहे.