Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

Ghaziabad: सराफा व्यावसायिकाला गोळ्या घालून लुटणाऱ्या तीन गुन्हेगारांना चकमकीनंतर अटक

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सोमवारी पहाटे पोलिस आणि बदमाशांमध्ये चकमक झाली ज्यामध्ये तीन बदमाशांना अटक करण्यात आली आहे तर एक बदमाश पळून गेला आहे. नुकत्याच झालेल्या एका सराफा व्यावसायिकाला लुटून त्याला गोळ्या घालून जखमी केल्याच्या घटनेत या चोरट्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रीय Shreya Varke | Jun 24, 2024 11:51 AM IST
A+
A-
Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

Ghaziabad: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सोमवारी पहाटे पोलिस आणि बदमाशांमध्ये चकमक झाली ज्यामध्ये तीन बदमाशांना अटक करण्यात आली आहे तर एक बदमाश पळून गेला आहे. नुकत्याच झालेल्या एका सराफा व्यावसायिकाला लुटून त्याला गोळ्या घालून जखमी केल्याच्या घटनेत या चोरट्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. सहायक पोलिस आयुक्त रवी कुमार सिंह यांनी सांगितले की, नंदग्राम पोलिस ठाण्यातील एका सराफा व्यापाऱ्यासोबत लुटमार आणि गोळीबाराच्या घटनेतील आरोपी आज दुसरी  हिंडन रिव्हर मेट्रोवरून राजनगर एक्स्टेंशनकडे जाऊ शकतो, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

स्वाट टीम क्राईम ब्रँच, स्वाट टीम सिटी झोन ​​आणि पोलिस स्टेशन नंदग्राम यांनी हिंडन रिव्हर मेट्रोवर तपासणी केली. आज पहाटे दोन दुचाकींवर आलेल्या चौघांना थांबण्याचा इशारा केला. पोलिसांचा ताफा पाहून चौघांनीही आपापल्या दुचाकी वळवल्या आणि मागे पळू लागले आणि पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या कारवाईत दोन हल्लेखोर जखमी झाले असून त्यांना अटक करण्यात आले आहे. दुसरा गुन्हेगार काही अंतरावर पळत असताना पकडला गेला तर त्याचा चौथा साथीदार घटनास्थळावरून पळून गेला.

पोलीस त्याच्या शोधात आहेत. ११ जून रोजी नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत या चोरट्यांनी सोनारावर गोळी झाडून लुटल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्तांनी दिली आहे. चकमकीनंतर आरोपी पवन, प्रशांत आणि लखन यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चकमकीत दोन आरोपींच्या पायाला गोळी लागली. त्यांच्या ताब्यातून अवैध शस्त्र, काडतुसे, चोरीची मोटारसायकल व 15,500 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

 


Show Full Article Share Now