Kapil Sharma च्या सेट वर जेव्हा Riteish Deshmukh आणि Akshay Kumar मधला फरक धूसर होतो; वाचा सविस्तर
रितेश देशमुख (Photo Credits : Yogen Shah)

हाऊसफुल्ल 4 (Housefull 4) सुपरहिट झाला आहे. समीक्षकांनी टीका करूनही आणि वाईट रिव्युज असूनसुद्धा प्रेक्षकांनी चित्रपटाला उचलून धरले आणि आधीच्या हाऊसफुल्लच्या भागांप्रमाणेच बक्कळ कमाई केली. कथा, सेट, भव्यदिव्यता याबरोबरच लोकांना आवडत आहे ती अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची केमिस्ट्री.

दोघांचीही मैत्री जगजाहीर आहे. हाऊसफुल्लच्या पहिल्या भागापासून सुरु झालेली यांची मैत्री दिवसेंदिवस बहरतच गेली. रितेश आणि अक्षय कोणत्याही सेट वर एकत्र आले की धमाल उडवून देतात. दोघांचंही टायमिंग जबरदस्त आहे. कपिल शर्माच्या सेट वर रितेशने कित्येकदा मजे मजेमध्ये अक्षयच्या मिळकतीची थट्टाही उडवली आहे. आता मात्र कपिलच्या सेट वर रितेशने अक्षयच्या चालण्याची नक्कल केली आहे आणि ती इतकी हुबेहूब आहे की खरंच अक्षय कुमार आला आहे की काय इतपत शंका यावी. (हेही वाचा. मामा Govinda सोबत शूट करण्यापासून Krushna ला केला गेला मज्जाव; Kapil Sharma च्या सेट वर दिसला नात्यातला दुरावा)

पाहा व्हिडिओ:

 

रितेश, सिद्धार्थ मल्होत्रा आणि 'मरजावा'ची अख्खी टीम कपिल शर्माच्या सेटवर सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्या वेळी शूट केलेला हा व्हिडिओ जो कपिल शर्माने शेयर केला आहे, तो व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये रितेशने केलेला अक्षयचा अभिनय पाहून उद्या जर कधी अक्षयच्या आयुष्यावर बायोपिक काढायची वेळ आली तर त्यासाठी रितेशने आपला दावा पक्का केला असल्याचं नक्कीच सांगता येईल.